विजय मल्ल्याचे लवकरच प्रत्यार्पण होणार?

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक ब्रिटनला रवाना झाले आहे.

नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींपक्षा जास्त रकमेचे कर्ज थकित ठेऊन परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्लाचे लवकरच प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (सोमवार) ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक ब्रिटनला रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे याप्रकरणाची जबाबाबदी होती. मात्र, आता सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वात ही कारवाई होणार आहे.  

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला दणका देताना मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

Web Title: Vijay Mallya Extradition Case A Joint Team Of CBI And ED Left For UK For Court Proceeding