धक्कादायक : सुप्रीम कोर्टातून, विजय मल्ल्याच्या फाइल्स हरवल्या, 20 ऑगस्टला सुनावणी

टीम ई-सकाळ
Saturday, 8 August 2020

देशातील बँकांची 9 हजार कोटी बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात आला होता. 14 जुलै 2017 रोजी या खटल्यात विजय मल्ल्या दोषी आढळला आहे.

नवी दिल्ली : देशातील बड्या बँकांची देणी थकवून ब्रिटनला पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. त्याच्या संबंधित माहिती असणारी कागदपत्रेच हरवल्याची धक्कादायक माहिती पुढं आलीय. विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टातून (Supreme Court)ही कागदपत्रे हरवली आहेत. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. विजय मल्ल्याला कोण वाचवतंय? अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. विजय मल्ल्यासारख्या गंभीर आणि देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रकरणाची कागदपत्रे हरवतातच कशी?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे प्रकरण?
देशातील बँकांची 9 हजार कोटी बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्याविरुद्ध (Vijay Mallya) सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात आला होता. 14 जुलै 2017 रोजी या खटल्यात विजय मल्ल्या दोषी आढळला आहे. बँकांनी सातत्याने आठवण करून देऊनही मल्ल्याने त्यांचे पैसे परत करण्यासाठी प्रतिसाद दिला नाही. या बँकांमध्ये एसबीआयसह (SBI) अनेक बड्या बँकांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला मल्ल्याने आपल्या मुलांसाठी 4 कोटी डॉलर ट्रास्फर केल्याचे पुरावे होते. हे सगळे खटल्याचे पुरावे सुप्रीम कोर्टातून हरवले आहेत. त्यामुळं संपूर्ण यंत्रणेलाच धक्का बसला आहे. 

केरळमधील विमान दुर्घटनेच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय होणार?
दरम्यान, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानेच दखल घेतली आहे. येत्या 20 ऑगस्टला या प्रकरणी विशेष सुनावणी होणार आहे. न्यायाधीश यू यू ललीत, अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होणा आहे. कोर्टाने याची गंभीर दखल घेताना, या फाईल्ससांभळणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे मागितली आहे. मल्ल्या विरोधात लागलेल्या निकालामुळं गेले तीन वर्षे तो, फेरविचार याचिका दाखल करत आहे. या याचिकेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचीही नावे मागण्यात आली आहेत. 

Story Created by Raviraj Gaikwad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay mallya files missing from supreme court