विजय मल्ल्या जामीनावर; सुनावणी पुढे ढकलली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

या खटल्याची सुनावणी गेल्या 4 डिसेंबरपासून सुरु आहे. मल्ल्याने भारतात सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने त्याला एप्रिल 2017 मध्ये हस्तांतरणाच्या वॉरंटखाली अटक केली होती. यानंतर साडेसहा लाख पौंड भरल्यानंतर मल्ल्याला जामीन देण्यात आला होता

लंडन - आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या याचे भारताकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील प्रकरणी मल्ल्यास 2 एप्रिलपर्यंत जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी अद्यापी दिनांक निश्‍चित करण्यात आलेला नाही.

मल्ल्याची बाजू मांडणाऱ्या विधिज्ञ क्‍लेअर मॉंटगोमेरी यांनी मल्ल्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास केलेल्या भारतीय तपास अधिकाऱ्यांच्या विश्‍वासार्हतेवर यावेळी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या खटल्याची सुनावणी गेल्या 4 डिसेंबरपासून सुरु आहे. मल्ल्याने भारतात सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने त्याला एप्रिल 2017 मध्ये हस्तांतरणाच्या वॉरंटखाली अटक केली होती. यानंतर साडेसहा लाख पौंड भरल्यानंतर मल्ल्याला जामीन देण्यात आला होता.

या प्रकरणी निकाल विरोधात लागल्यास दोन्ही बाजुंना ब्रिटनमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची मुभा आहे. या प्रकरणी आजची सुनावणी ही अंतिम असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Web Title: Vijay Mallya gets bail till April 2