मला पोस्टर बॉय करण्यात आले : विजय मल्ल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोघांनाही 15 एप्रिल 2016 रोजी पत्र लिहिले होते. आता सर्व बाबी योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मी ही पत्रे सार्वजनिक करत आहे. माझ्या पत्रावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याने मी ते पत्र सार्वजनिक करत आहे''. 

- विजय मल्ल्या

नवी दिल्ली : विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक केले. मल्ल्याने दोन वर्षांपूर्वी हे पत्र लिहिले होते. विजय मल्ल्याने आपल्याला बँक गैरव्यवहाराचा 'पोस्टर बॉय' करण्यात आल्याचे सांगितले. 

ब्रिटनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोघांनाही 15 एप्रिल 2016 रोजी पत्र लिहिले होते. आता सर्व बाबी योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मी ही पत्रे सार्वजनिक करत आहे. माझ्या पत्रावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याने मी ते पत्र सार्वजनिक करत आहे''. 

विजय मल्ल्याने सांगितले, की ''मी नऊ हजार कोटींचे कर्ज घेऊन पसार झालो आहे, असा आरोप नेते आणि मीडिया माझ्यावर करत आहेत. तसेच कर्ज देणाऱ्या काही बँकांना मला कर्जबुडव्याही घोषित केले आहे''. 

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सरकार आणि बँकांच्या सांगण्यावरुन माझ्याविरोधात खोटे आरोपपत्र दाखल केले, असल्याचा आरोपही विजय मल्ल्याने यावेळी केला. 

Web Title: Vijay Mallya offers to sell assets to repay bank loans says he has become poster boy