मल्ल्याच्या 'स्काय मॅन्शन' वादाच्या भोवऱ्यात सापडणार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

उद्योगपती विजय मल्ल्या याच्या बंगळूरमधील दोन कोटी डॉलरच्या "स्काय मॅन्शन' या आलिशान इमारतीचा उल्लेख बुधवारी राज्यसभेत करण्यात आला. बनावट कंपन्यांमार्फत "स्काय मॅन्शन'मध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे का याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या याच्या बंगळूरमधील दोन कोटी डॉलरच्या "स्काय मॅन्शन' या आलिशान इमारतीचा उल्लेख बुधवारी राज्यसभेत करण्यात आला. बनावट कंपन्यांमार्फत "स्काय मॅन्शन'मध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे का याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

शून्य प्रहरात संयुक्त जनता दलाचे हरिवंश यांनी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बनावट कंपन्या बेकायदा कारवाया करण्याचे साधन बनल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून कर चुकवेगिरी आणि काळा पैसा पांढरा करण्याचे काम सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने नुकतीच बनावट कंपन्यावर कारवाई केली. महालेखापालांनीही याबाबत प्राप्तिकर विभागाला तंबी दिली आहे. देशभरात 15 लाख कंपन्या नोंदणीकृत असून, त्यातील केवळ 6 लाख कंपन्या प्राप्तिकर भरतात. मल्ल्या याचे नाव न घेता "स्काय मॅन्शनबाबत बोलताना ते म्हणाले, की बंगळूरमध्ये आलिशान इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत 40 हजार चौरस फूटांची असून, त्यावर हेलिपॅडही आहे. ही इमारत स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे 6 हजार 203 कोटी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या व्यक्तीच्या मालकीची आहे. या इमारतीचे बांधकाम आणि निधी यासाठी बनावट कंपन्यांचा आधार घेण्यात आला का हे तपासावे.

अर्थविषयक अधिक बातम्यांसाठी क्‍लिक करा : sakalmoney.com

Web Title: Vijay Mallya's Sky Mansion' is ready, but will he get possession?