विजय रूपानी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

गांधीनगर येथे एका भव्य कार्यक्रमात विजय रूपानी यांना शपथ देण्यात आली. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याशिवाय काही साधू आणि धार्मिक नेत्यांनाही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

अहमदाबाद : सलग सहाव्यांदा गुजरात जिंकणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी विजय रूपानी यांना संधी दिली असून, रूपानी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, नितीन पटेल हेदेखील उपमुख्यमंत्रिपदी कायम राहिले. 

गांधीनगर येथे एका भव्य कार्यक्रमात विजय रूपानी यांना शपथ देण्यात आली. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याशिवाय काही साधू आणि धार्मिक नेत्यांनाही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. मोदींनी याठिकाणी पोहचण्यापूर्वी विमानतळापासून सचिवालयापर्यंत रोड शो केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये रूपानी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी यांनी रूपानी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकत बहुमत मिळविले होते. एका अपक्षानेही पाठिंबा दिल्याने भाजपसमर्थक आमदारांची संख्या शंभरवर पोचली आहे.

Web Title: Vijay Rupani sworn in as chief minister of Gujarat