हुतात्मा पोलिसाच्या बहिणीची सरकारकडे मागणी,'विकासला संपवलं आता...'

kanpur orraiya
kanpur orraiya

औरेया - गँगस्टर विकास दुबे मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशात गेल्यानंतर कानपूर इथं एन्काउंटरमध्ये ठार झाला. विकास ठार झाल्यानंतर बिकरू घटनेत हुतात्मा झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. औरेयातील हुतात्मा पोलिस राहुलच्या कुटुंबियांनी विकास दुबे मारला गेल्यानंतर जे झालं ते चांगलं झालं असं म्हटलं आहे. हुतात्मा राहुल रुरुकला इथं राहत होते. त्यांची बहीण नंदिनी यांनी विकासच्या एन्काउंटरनंतर सांगितलं की, आज भावाचा शांती होम आहे. विकासच्या एन्काउंटरमुळे भावाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. आता विकासच्या साथीदारांना लवकर पकडावं आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणीही नंदिनी यांनी सरकारकडे केली आहे. विकास दुबेने पोलिसांवर हल्ला केला तेव्हा काही वेळातच 50 हून अधिक गुंड बोलावले होते. 

कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला. गुरुवारी तो नाट्यमयरित्या पोलिसांना शरण आला होता. उज्जैनमध्ये अटक केल्यानंतर विकास दुबेला विशेष कृती दल 3 गाड्यांमधून 700 किमी दूर असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरला घेऊन येत होते. तेव्हा देहातमध्ये अचानक ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. त्याच गाडीत विकास दुबे होता. तेव्हा विकास गाडीतील पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला शरणागती पत्करण्यास सांगितलं पण त्याऐवजी विकासने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास ठार झाला. या चकमकीमध्ये 4 पोलिस जखमी जाले. एसएसपी आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास दुबे ठार झाल्याची माहिती दिली. 

कानपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी सांगितलं की, एसटीएफच्या गाडीला अपघात झाला होता. यावेळी आरोपी विकास दुबेने कारमध्ये असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागून येणाऱ्या गाड्याही घटनास्थळी आले. तेव्हा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला. चकमकीमध्ये 4 पोलिस जखमी झाले असून  यात एक इन्स्पेक्टर, एएसआय आणि दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

विकास दुबेच्या अटकेनंतर अशी  माहिती समोर आली होती की तो पॉल असं नाव असलेल्या खोट्या ओळखपत्राचा वापर करत होता. विकास गुरुवारी उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला होता. तिथं एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं. त्याची ओळख पटल्यानंतर उज्जैन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com