Vikrant : भारताचा ‘विक्रांत’ परतला; स्वदेशी विमानवाहू नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikrant Marathi News

भारताचा ‘विक्रांत’ परतला; स्वदेशी विमानवाहू नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली : कोचीन शिपयार्ड लिमिटेडने (CSL) गुरुवारी (ता. २८) स्वदेशी बनावटीची विमानवाहू (Aircraft) नौका विक्रांत नौदलाकडे (Indian Navy) सुपूर्द केली आहे. विक्रांतची रचना नौदलाच्या इंटिरिअर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (IAC-१) भारतीय नौदलाला सोपवण्यात आली आहे.

१९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय नौदल जहाज (INS) विक्रांतच्या (Vikrant) नावावरून हे नाव देण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अधिकृतपणे नौदलात (Indian Navy) सामील होऊ शकते. IACच्या समावेशामुळे हिंद महासागर क्षेत्रात (IOR) देशाची स्थिती आणखी मजबूत होईल. CSLने एका प्रसिद्धिपत्रकात विमानवाहू जहाज सुपूर्द केल्याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा: Don't Talk To Me; संसदेत स्मृती इराणींवर सोनिया गांधी संतापल्या

ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी युद्धनौका (Aircraft) आहे. वजन सुमारे ४५,००० टन आहे. याला देशातील सर्वांत महत्त्वाकांक्षी नौदल जहाज प्रकल्प देखील मानले जाते. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौकेने १९७१च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी होती. त्याच्या नावावर IACचे नाव ठेवण्यात आले आहे. विक्रांतच्या पुनर्जन्माच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा सागरी सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने क्षमता निर्माण करण्याच्या देशाच्या उत्साहाचा खरा पुरावा आहे.

८८ मेगावॅटची ऊर्जा मिळेल

नवीन जहाज २६२ मीटर लांब आणि अधिक प्रगत आहे. याला चार गॅस टर्बाइनद्वारे एकूण ८८ मेगावॅटची ऊर्जा मिळेल. या जहाजाचा कमाल वेग २८ ‘नोट्स’ आहे. सुमारे २०,००० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प संरक्षण मंत्रालय आणि CSL यांच्यातील करारासह तीन टप्प्यांत पुढे गेला.

हेही वाचा: चिंता नाही! युरोपमध्ये थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचे व्हेरियंट वेगळं : ICMR

७६ टक्के स्वदेशी साहित्य वापरले

IAC तयार करण्यासाठी एकूण ७६ टक्के स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. जे देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे उत्तम उदाहरण आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देते, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Vikrant Handover Indigenous Aircraft Indian Navy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaAircraftIndian Navy