....यापुढे 'छक्का' म्हणू नका

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

भोपाळ: पन्ना जिल्ह्यातील 'छक्का' या गावाचे नाव बदलण्यात आले असून, यापुढे हे गाव 'महगवान सरकार' या नावाने ओळखले जाणार आहे आहे. अनेक वर्षांपासून स्वतःच्या गावाच्या मागे 'छक्का' हे नाव लागल्याने गावकऱयांना लाज वाटत होती.

भोपाळ: पन्ना जिल्ह्यातील 'छक्का' या गावाचे नाव बदलण्यात आले असून, यापुढे हे गाव 'महगवान सरकार' या नावाने ओळखले जाणार आहे आहे. अनेक वर्षांपासून स्वतःच्या गावाच्या मागे 'छक्का' हे नाव लागल्याने गावकऱयांना लाज वाटत होती.

ग्रामस्थांनी 'छक्का' हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 2013मध्ये गावच्या पंचायतीकडून नाव बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी राज्याकडून केंद्राला नावाचे गाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर 7 सप्टेंबर 2017ला केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी होत आता गावाचे नाव बदलून 'महगवान सरकार' ठेवण्यात आले आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार 'महगवान सरकार' या गावात 280 कुटुंबे राहत असून, लोकसंख्या 1139 एवढी आहे. सरकारने गावाचे नाव बदलल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पन्ना जिल्ह्यातल्या या गावाला 1924 रोजी महगवान छक्का असे नाव पडले होते. परंतु, गावाचे नाव असे का ठेवण्यात आले होते, हे कोणालाही सांगता येत नाही. ग्रामस्थ म्हणाले, 'गावातल्या नागरिकांना स्वतःच्या गावाचे नाव सांगताना अडचण वाटत होती. विशेषतः महिला गावचे नाव सांगताना कुचरत होत्या. परिसरात गावचे नाव परिचित होते. परंतु, नवख्यांना नाव सांगताना मोठी अडचण वाटे. परंतु, यापुढे गावचे नाव सांगताना अभिमान वाटेल.'

Web Title: village name change chhaka to mahgawan sarkar