भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक
भय्यू महाराजांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. भय्यूजी महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी विनायक दुधाले, शरद देशमुख या दोन सेवेकऱ्यांसोबत पलक या 25 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे.
इन्दूर : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. ही तरुणी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होती, असे सांगण्यात येत आहे.
भय्यू महाराजांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. भय्यूजी महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी विनायक दुधाले, शरद देशमुख या दोन सेवेकऱ्यांसोबत पलक या 25 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर लग्नासाठी भय्यूजी महाराज यांना ब्लॅकमेल केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे सर्वजण भय्यूजी महाराजांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचेही समोर आले आहे.
पोलिस अधिक्षक प्रशांत चौबे म्हणाले, की भय्यू महाराजांनी 12 जूनला आत्महत्या केली होती. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा यांनी नुकतीच दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.