विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीकडून एकाला मारहाण

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

रविवारी दुपारी मुंबईतल्या एका मॉलमध्ये राजेंद्र कुमार यांचा कांबळीच्या पत्नीला हात लागला, त्या कारणास्तव कांबळीने त्यांना मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये गर्दी असल्याने चालताना चुकून राजेंद्र कुमार यांचा हात कांबळीच्या पत्नीला लागला. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया हेवित यांनी एका 58 वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र कुमार तिवारी यांनी या प्रकरणात पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे.

रविवारी दुपारी मुंबईतल्या एका मॉलमध्ये राजेंद्र कुमार यांचा कांबळीच्या पत्नीला हात लागला, त्या कारणास्तव कांबळीने त्यांना मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये गर्दी असल्याने चालताना चुकून राजेंद्र कुमार यांचा हात कांबळीच्या पत्नीला लागला. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. रविवार असल्याने मॉलमध्ये गर्दी होती. माझे वडील माझ्या मुलीला गेमिंग झोनकडून फूड कोर्ट घेऊन चालले होते. याच दरम्यान ही घटना घडली. माझ्या वडिलांनाही कांबळीच्या पत्नीला स्पर्श झाला ते कळाले नव्हते, अशी माहिती राजेंद्र कुमार यांचा मुलगा अंकुरने दिली आहे. त्याने माझ्या वडिलांच्या तोंडावर बुक्की मारली, माझ्या वडिलांनाही काय होतंय हे समजले नाही. त्यानंतर त्यांनी फूड कोर्ट येथे आल्यानंतर सर्व माहिती सांगितली. मी कांबळी जवळ गेलो तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कांबळीने मलाही धक्का दिला आणि शिवीगाळ केली. कांबळीच्या पत्नीने पायातली सँडल काढली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्याकडून चुकून धक्का लागल्याचे मी त्यांना सांगितल्यानंतरही तिने मला शिवीगाळ सुरूच ठेवली, असे राजेंद्र यांनी पोलिसांत तक्रार देताना म्हटले आहे.

राजेंद्रकुमार हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. त्यांनी बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 504 आणि कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Vinod Kamblis wife Andrea accuses Ankit Tiwaris father of touching her inappropriately