विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

दिल्ली येथे शास्त्री भवनमध्ये शेखर कपूर यांच्या अध्यक्षेखालील 10 सदस्यांच्या परीक्षकांनी या सर्वांची निवड केली. श्रीदेवी यांना 'मॉम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. एका घटनेचे शिकार बनलेल्या आईची जीवनगाथा या चित्रपटात रेखाटली आहे.

नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.  

sridevi

दिल्ली येथे शास्त्री भवनमध्ये शेखर कपूर यांच्या अध्यक्षेखालील 10 सदस्यांच्या परीक्षकांनी या सर्वांची निवड केली. श्रीदेवी यांना 'मॉम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. एका घटनेचे शिकार बनलेल्या आईची जीवनगाथा या चित्रपटात रेखाटली आहे. तसेच या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटानेही बाजी मारली. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म पुरस्कार मराठीच्या सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत'ला मिळाला. 

याशिवाय 'म्होरक्या' या चित्रपटाला स्पेशल मेन्शन अॅवॉर्ड व सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला. 'मृत्यूभोग' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादनासाठी पुरस्कार मिळाला आहे. नागराज मंजुळेच्या 'पावसाचा निबंध'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आहे.

Web Title: Vinod Khanna honoured with Dadasaheb Phalke Award