हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

जर भीती आणि अराजकता असल्यास राज्यांनी यावर सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच जमावाकडून होणारा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले. 

नवी दिल्ली : जमावाकडून अनेकदा हिंसाचार केला जातो. या हिंसाचारातून सरकारी तसेच विविध खासगी मालमत्तांचे नुकसान होत असते. या हिंसाचारावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने आपले मत मांडले. सर्वोच्च न्यायालयाने या जमावाकडून होत असलेला हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही. तसेच या हे सर्व थांबविण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करावा, असेही न्यायालयाने सांगितले.

देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ शकत नाहीत. तसेच ते स्वत:साठी कायदा बनवू शकत नाही. लोकशाहीमध्ये गंभीर गुन्ह्यांसाठी नवा मानदंड तयार करण्याची परवानगी देता येऊ शकत नाही. याशिवाय शस्त्रास्त्रांचा वापर हिंसाचारासाठी करु शकत नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. तसेच न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या सर्वासाठी मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत नोंदविले. 

दरम्यान, जर भीती आणि अराजकता असल्यास राज्यांनी यावर सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच जमावाकडून होणारा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले. 

Web Title: Violence cant be allowed says Supreme Court