बिहारमधील गावात नक्षलवाद्यांचा हिंसाचार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पाटणा : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील सुदी बिगहा गावात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसाचार घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी भाजपचे विधान परिषदेचे सदस्य राजन सिंह यांचे काका नरेंद्र सिंह यांचा गोळ्या घालून खून केला आणि सुमारे 12 गाड्यांना आग लावून त्या भस्मसात केल्या. हलाला केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या सुमारे दीडशे असल्याचे सांगितले जाते. 

हिंसाचाराची ही घटना पाटण्यापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर शनिवारी रात्री घडली. राज्याचे पोलिस महासंचालक के. एस. द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सशस्त्र नक्षलवाद्यांनी सुदी बिहागा गावात बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची घटना कळताच सुरक्षा दलाच्या जवानांची तुकडीही त्या परिसरात पोहोचली व त्यांची नक्षलवाद्याबरोबर चकमक सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू झाली. त्यानंतर नक्षलवादी पळून गेले. 

नरेंद्र सिंह हे प्रवासी बस कंपनीचे मालक आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडून खंडणी मागितली असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यावरून ते नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर होते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच बस, तीन ट्रॅक्‍टर, दोन मोटारी आणि एक बाईक भस्मसात झाली. गावात जाणाऱ्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली. 

याच जिल्ह्यातील दलेलचक बघौरा गावावर नक्षलवाद्यांनी 1987मध्ये हल्ला केला होता व त्या वेळी उच्चवर्णीय 48 जणांची हत्या केली होती. त्यानंतर गेल्या तीन दशकांमध्ये या भागांत कायम हिंसाचार सुरू आहे.

Web Title: Violence of Naxalites in Bihars village