पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरुच; अनेक जण जखमी

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरुच; अनेक जण जखमी

भातपाडा (पश्‍चिम बंगाल) : पश्‍चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यातील भातपाडा भागात शनिवारी झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले. कलम-144चे उल्लंघन करीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

भाजपच्या तीन सदस्यांच्या केंद्रीय शिष्टमंडळाने शनिवारी या भागाला भेट दिली. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने हिंसाचाराला सुरवात झाली. दोन्ही बाजूंकडून या वेळी दगडफेक करण्यात आली. देशी बॉंबही फेकण्यात आले. त्यात अनेक जण जखमी झाले. हा हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, असे सांगण्यात आले.

भातपाडामध्ये मागील अनेक दिवसांपासून भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला होता. 

'पोलिस गोळीबारात दोघांचा मृत्यू' 

भातपारामध्ये पोलिसांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा भाजपच्या केंद्रीय शिष्टमंडळाकडून करण्यात आला. भाजपच्या या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया, खासदार सत्यपालसिंह आणि बी. डी. राम यांचा समावेश होता. भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याचे आम्हाला सांगण्यात आले. हवेत गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला, तरी त्यात तथ्य नाही, असे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com