Video: शाब्बास! नदीत बुडाला म्हणून सगळं गाव ज्याच्या शोधात तो पठ्ठ्या सापडला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whole village is in search of this man he was in home, prank Video

Video: शाब्बास! नदीत बुडाला म्हणून सगळं गाव ज्याच्या शोधात तो पठ्ठ्या सापडला..

पलासनी गावाजवळील मीढळी नदीच्या किनारी नशेत असणारा एक माणूस सकाळी ९ वाजताच्या सुमारास नदीच्या पुलावरून थेट नदीत उडी घेतो आणि त्याला वाचवण्यासाठी अक्ख्खं गाव नदीच्या पूलावर जमतं. प्रशासनदेखील या माणसाचा नदीत ठिकठिकाणी शोध घेत होतं. खरं तर ही घटना वाचताना तुम्हाला हे फारच गंभीर असल्याचे वाटत असेल. मात्र या व्हिडिओचा शेवट बघून अनेकांना अक्षरश: त्यांचं हसूच आवरलं नाही. घासीराम नावाच्या पठ्ठ्याचा प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. (Whole village is in search of this man he was in home, prank Video)

सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. सुरूवातीला गंभीर वाटणारे काही व्हिडिओ कधी कधी एवढे विनोदी असतात की त्यांना बघून अक्षरश: हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. घासीराम नावाच्या एका व्यक्तीचा हा व्हिडिओ असून हा व्यक्ती व्हिडिओमध्ये नदी किनारी जातो आणि थेट नदीत उडी मारतो. नदी किनारी त्यावेळी असणारी लोकं ओरडत त्याला उडी घेऊ नकोस म्हणत होती. मात्र या पठ्ठ्याने उडी घेतली आणि त्याचा शोध घेण्यासाठी नदी किनारी अक्ख्खं गाव आणि प्रशासनाची माणसं जमली होती.

हेही वाचा: Swiggy: अनपेक्षितच! ऑर्डर घेतली आईस्क्रिमची आणि चक्क पाठवले 'Condom...'

आणि हा पठ्ठा नदीत उडी मारत दोन किमी अंतरावर पोहत गेला. आणि त्याच्या घरी जाऊन निवांत झोपला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असून अक्षरश: ज्यांनीही हा व्हिडिओ बघितला त्यांना हसूच आवरेना.

Web Title: Viral Video A Man Jumped Into River Villagers Gathered Near River As They Think He Sinked But He Swimmed And Reached Home Prank Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..