Viral Video: धडाकेबाज फलंदाज! क्रिकेट खेळण्यात गजराज व्यस्त

Perfect Player म्हणून होतय हत्तीचं कौतुक
elephant playing cricket like a pro
elephant playing cricket like a pro

सगळ्यात समजूतदार, प्रेमळ आणि तितकाच हुशार प्राणी म्हणून कायमच हत्तीकडे पाहिलं जातं. त्यासोबतच तो मानवाचा चांगला मित्र म्हणूनही ओळखला जातो. सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा हत्तींचे काही मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा अशाच एका मस्तीखोर हत्तीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या हत्तीवर सध्या क्रिकेटचा फिवर चढला असून तो क्रिकेट (Cricket) खेळण्यात बिझी असल्याचं पाहायला मिळत आहे. (viral video of elephant playing cricket like a pro)

elephant playing cricket like a pro
तुरटीच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती बॅटींग (Batting) करत असून त्याचा सांभाळ करणारी माणसं मात्र, फिल्डींग, बॉलिंग करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा (Coronavirus) काळ सुरु असल्यामुळे आयपीएल (IPL) रद्द करण्यात आली. परंतु, या गजराजाने क्रिकेट खेळून अनेकांची मन जिंकून घेतली आहेत.

दरम्यान, हा हत्ती केवळ क्रिकेट खेळलाच नाही तर त्याने चक्क षटकार आणि चौकार मारले आहेत. त्यातच या हत्तीची बॅटींग स्टाइल अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळेच कमी कालावधीत हा व्हिडीओ तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर ३०० पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com