Viral Video : 'माझी आई उपवासात नेहमी खायची', डॉक्टरने खाल्ले गाईचे शेण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Eat Cow dung

Viral Video : 'माझी आई उपवासात नेहमी खायची', डॉक्टरनं खाल्लंय गाईचं शेण

एका डॉक्टरने चक्क गाईचे शेण (Cow Dung) खाल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इतकेच नाहीतर गाईचे शेण हे आरोग्यदायी असल्याचा दावा देखील या डॉक्टरने केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत (doctor eat cow dung viral video) असून नेटकऱ्यांनी डॉक्टरला चांगलेच ट्रोल केले आहे.

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

मिळालेल्या माहितीनुसार मनोज मित्तल, असे या डॉक्टरचे नाव असून ते एमबीबीएस एमडी असल्याचे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिसतेय. ते हरियाणातील करनाल येथील बालरोगज्ज्ञ आहेत. मित्तल हे एका गोशाळेत गेले असून गाईकडून मिळणाऱ्या पाच गोष्टींबद्दल बोलताना व्हिडिओमध्ये दिसतात. त्यानंतर त्यांनी गायीचे शेण उचलले आणि ते तोंडात टाकले. इतकेच नाहीतर माझी आई उपवासामध्ये गाईचे शेण खायची असंही त्यांनी सांगितलं. ''शेणामध्ये मन आणि आत्मा शुद्ध करण्याची क्षमता आहे. शेणाने एकदा का आपल्या शरीरात प्रवेश केला की शरीर देखील शुद्ध होते, असा अजब दावाही त्यांनी या व्हिडिओमधून केला आहे.

हा व्हिडिओ हरियाणातील स्थानिक वेबसाईटने पहिल्यांदा पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली असून नेटकऱ्यांनी चांगलंय ट्रोल केलंय. डॉक्टरांनी हे काम जितक्या सहजतेने केलंय तितक्या सहजतेने आम्ही तर राजमा खाऊ शकत नाही, असं एकाने म्हटलंय. दुसऱ्याने एकाने म्हटलंय, याला ''शिजवायची किंवा यात मीठ घालायची गरज नाही का? हे सुपरफूड आहे का?''

loading image
go to top