Viral Video: अवघ्या काही सेकंदात पेट्रोल पंपावरील लोकं होतायत गायब? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या काही सेकंदात पेट्रोल पंपावरील लोकं होतायत गायब?

अवघ्या काही सेकंदात पेट्रोल पंपावरील लोकं होतायत गायब?

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काहीवेळा हे व्हिडिओ पाहताना अंगावार काटा येतो. तर बऱ्याचवेळा हे फेक असतील अशी शंकाही येते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ आहे तो एका पेट्रोल पंपावरील. यातून अवघ्या काही सेकंदात पेट्रोल पंपावरील लोकं होतायत गायब होताना दिसत आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकार इन अ‌ॅक्शन मोड! राऊतांच्या आरोपानंतर ED विरोधात तपास सुरू

असा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पेट्रोल पंपाजवळ असलेले लोक अचानक गायब होत आहेत. काही सेकंदातच हा सगळा प्रकार घडला आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दोन व्यक्ती आले आहेत. तेथील दोन कर्मचारी आणि गाडी चालकासोबत असणारी आणखी एक व्यक्ती असे चौघे जण या व्हिडिओत दिसत आहेत. या व्हिडिओतून एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसत आहे. दरम्यान, चालकासोबत असणारी व्यक्ती फोनवर बोलण्यात गुंग दिसत आहे. त्यामुळे काही सेकंदात त्याच्या पाया खालचा एक ब्लॉक सरकला आणि तो खाली खड्ड्यात पडला आहे. हा व्यक्ती अचानक जमिनीत गायब झाला. बाजूला असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मदतीसाठी धाव घेतली पण तोही खड्ड्यात पडला दोघेही पडले म्हणून तिसरा एकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आला मात्र तोही तोंडावर पडला आणि काही सेकंदातच जमिनीत गायब झाले असल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमुळे सध्या अशा ठिकाणी प्रत्येकाने सावधगिरी पाळली पाहिजे असे दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून व्हायरल झाला हे समजले नसले तरी व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्स येत आहेत.

हेही वाचा: ED ची मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता जप्त

Web Title: Viral Video Of Petrol Pump Drawing Three People Under The Land

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsvideo viral
go to top