राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' झाला निवृत्त; यामुळे होता वेगळा

विराट 13 वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाला होता.
Virat elite horse of President's Bodyguard retires
Virat elite horse of President's Bodyguard retires ANI

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यात सलग 19 वर्षे सेवा बजावणारा घोडा विराट (President Ram Nath Kovind) आज अखेर सेवेतून निवृत्त झाला. राजपथ येथे 73 व्या प्रजासत्ताक (Republic Day Celebration) दिनाच्या समारंभाची सांगता झाल्यानंतर लगेचच, राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षक ताफ्यातील सदस्य असलेल्या विराटला (Virat Horse) सेवानिवृत्त केले. विराटला त्याच्या गुणवत्ता आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडमेंट कार्ड देण्यात आले आहे. (Virat Elite Horse Of President's Bodyguard Retires)

Virat elite horse of President's Bodyguard retires
Republic Day : Google 'डूडल' च्या देशवासियांना खास पद्धतीने शुभेच्छा

सुरक्षेसाठी नेहमी होता सक्रिय

राष्ट्रपतींच्या (President Ram Nath Kovind) सुरक्षा ताफ्यात विराटची भूमिका विशेष आहे. यामुळेच निवृत्तीच्या वेळी पीएम मोदी (PM Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Of India ) यांनीही विराटकडे जाऊन त्याची पाठ थोपटली. राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हा सामान्य घोडा नसून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य आहे, ज्याला राष्ट्रपतींचे अंगरक्षक चार्जर असेही म्हणतात.

सलग 19 वर्षे बजवली सेवा

विराट 13 वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (Republic Day Celebration) सहभागी झाला आहे आणि जवळपास 19 वर्षांपासून सेवेत आहे. आज विराटने राष्ट्रपतींना आपला अंतिम एस्कॉर्ट सादर केला. 15 जानेवारी रोजी विराटला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन मेडल असाधारण सेवा आणि क्षमतांसाठी देण्यात आले होते. अशा प्रकारचे मेडल मिळविणारा विराट हा पहिला घोडा आहे.

Virat elite horse of President's Bodyguard retires
Republic Day : अटारी-वाघा सीमेवर भारत-पाक सैनिकांकडून मिठाईचे वाटप

2003 मध्ये करण्यात आला होता समावेश

विराट हा सर्वात विश्वासू घोडा मानला जातो. हा हॅनोवेरियन जातीचा घोडा 2003 मध्ये अंगरक्षक कुटुंबात सामील झाला होता. नावाप्रमाणेच हा घोडा अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक उंचीचा आहे. हेमपूर येथील रिमाउंट ट्रेनिंग स्कूल आणि डेपोमधून हा घोडा 2003 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी येथे आणण्यात आला होता. विराटची निवड हजारोंमधून करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com