'माझा चंद्र, माझा सूर्य, विराट माझ्यासाठी सर्वकाही'

वृत्तसंस्था
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

विराट आणि अनुष्का यांना फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शनही दिले आहे. अनुष्काने लिहिले आहे, की माझा, चंद्र, माझा सूर्य, माझी चाँदणी आणि माझ्यासाठी सर्वकाही. तर, विराटनेही माझे आयुष्य, माझे जीवन अनुष्का शर्मा. 

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे स्टार कपल नेहमीच काही निमित्ताने फोटो शेअर करत असते. आता विरानुष्काने करवा चौथ निमित्त खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. 

विराट आणि अनुष्का यांना फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शनही दिले आहे. अनुष्काने लिहिले आहे, की माझा, चंद्र, माझा सूर्य, माझी चाँदणी आणि माझ्यासाठी सर्वकाही. तर, विराटनेही माझे आयुष्य, माझे जीवन अनुष्का शर्मा. 

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुण्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर म्हणजे शनिवारी करवा चौथ साजरा केला. विराट आणि अनुष्का यांनी हॉटेलच्या टेरेसवर करवा चौथ करत त्याचे फोटो शेअर केले. सामना साधारण रात्री साडेनऊच्या सुमारास संपला. त्यानंतर त्याने हॉटेलवर जाऊन अनुष्कासोबतचे फोटो रात्री अकरा वाजता शेअर केले आहेत. विराटने एकदिवसीय मालिकेत सलग तीन शतक झळकावत विक्रम नोंदविला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे. 

Web Title: Virat Kohli and Anushka Sharma celebrate Karvachauth in Pune