
- विराट कोहली याच्याकडे अनेक कार आहेत.
नवी दिल्ली : ऑडीची नवी क्यू 8 एसयूव्ही कार बुधवारी भारतात लाँच झाली. ही कार भारतात लाँच झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ती लगेचच खरेदी केली. त्यामुळे विराट कोहली हा ऑडी क्यू 8 चा भारतातील पहिला मालक ठरला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ऑडी क्यू 8 या कारच्या लाँचिंग इव्हेंटदरम्यान विराट कोहली उपस्थित होता. त्यानंतर विराट कोहलीने लगेचच ही कार विकत घेत या वाहनाचा पहिला मालक होण्याचा मान मिळवला. ही कार जर्मनीची लक्झरी ब्रँड असलेली आहे.
विराट कोहली याच्याकडे अनेक कार आहेत. Q7, Audi RS5, Audi RS6, A8 L, R8 V10 LMX, Bentley Continental GT आणि Range Rover Vogue यांसारख्या लक्झरी वाहनं त्याच्याकडे आहे. त्यानंतर आता त्याने Audi Q8 SUV ही गाडी घेतली आहे.
या कारमध्ये 3.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये आहे.