'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिका, विराटचे नाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून या यादीत नाही.

जगप्रसिध्द टाइम मॅगझिनने या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, भारतीय क्रिकेटर विराट कोहली, ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल आणि मायक्रोसॉफ्टचे भारतीय सीईओ सत्या नडेला यांची नावे आहेत.
   
दीपिकाच्या या यशानंतर 'xXx: Return of Xander Cage' या हॉलिवूटपटात तिच्या सोबत काम केलेला अभिनेता विन डिजेलने तिचे कौतुक केले आहे. 2018 च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत समाविष्ट झालेली दीपिका ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे. 2016 मध्ये या यादीत प्रियांका चोप्राचाचे नाव सामिल होते. 

Deepika Padukone

विराटबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'टाइम'मध्ये आपला अभिप्राय नोंदवून त्याचे भरभरून कौतुक केले आहे. 'त्याच्यात असलेली धावांची भूक आणि खेळातलं सातत्य यामुळे त्याने आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे. चूकांमधून शिकत त्याने बरीच प्रगती केली', असे सचिन तेंडूलकरने म्हटले आहे.

यु. एस. चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर ही नावे देखील जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये सामिल झाली आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून या यादीत नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता. 

Web Title: Virat Kohli Deepika Padukone Named In Times Hundred Most Influential People