तीन जवानांच्या कुटुंबाची स्वप्ने उद्धवस्तः सेहवाग

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवादी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले. तीन जवानच नव्हे तर तीन जवानांच्या कुटुंबाची स्वप्ने उद्धवस्त झाली आहेत, असे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून आज (गुरुवार) म्हटले आहे.

टि्वटरवर सतत सक्रीय असणाऱया व मोठ्या प्रमाणात चाहते असणाऱया सेहवागने ट्विटरवरून म्हटले आहे की, 'तीन जवान हुतात्मा झाले नाहीत तर तीन कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. जो काही उपाय असेल तो केला पाहिजे, हे सर्व कुठेतरी थांबायला हवे.'

सेहवागने ट्विट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात रि-ट्विट व लाईकही केले आहे.

दरम्यान, पुलवामा येथील लष्करी छावणीत पहाटे घुसून दहशतवाद्यांनी सैन्यावर अंदाधुंद गोळीबार करीत हल्ला केला. त्यांना लष्कराने तत्परतेने सडेतोड प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, यामध्ये 3 भारतीय जवान हुतात्मा झाले, तर दोन जखमी झाले.

Web Title: virendra sehwag twitt on 3 soldiers martyred