मुलांसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

गाजुवाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी. इमॅन्युएल राजू म्हणाले, की या महिलेवर दोघांनी बलात्कार केला. तसेच या महिलेला याबाबतची माहिती उघड केल्यास धमकी देण्यात आली. या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, चौकशी करण्यात येत आहे.

विशाखापट्टणम - शहरात एका 35 वर्षीय महिलेवर तिच्या तीन मुलांसमोरच दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी गाजुवाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की दोन अल्पवयीन मुलांसह चौघे जण घरात घुसले आणि यातील दोघांनी माझ्या तीन मुलांसमोर बलात्कार केला.

गाजुवाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी. इमॅन्युएल राजू म्हणाले, की या महिलेवर दोघांनी बलात्कार केला. तसेच या महिलेला याबाबतची माहिती उघड केल्यास धमकी देण्यात आली. या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, चौकशी करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
भारतीय लष्करातील जवान दहशतवाद्यांना सामील?
ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड​
काश्मीरमध्ये घुसखोरीत घट; 92 दहशतवाद्यांचा खात्मा​
गणेशोत्सव, दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक​
पावसाळी अधिवेशनापूर्वी दुपारी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक
भुजबळांची मालमत्ता जप्त​
मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का नाही? - उद्धव ठाकरे​
भाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'​
इस्राईलशी मैत्रीची कसदार 'भूमी'​

Web Title: Visakhapatnam: Woman gang-raped in front of children; 4 held