किशोरवयीन मुलांमुलींसाठी योगासनं महत्त्वाची; जाणून घ्या कारणे

विशाखा गायकवाड
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

भावनिक क्षमता चांगल्या प्रकारे वाढल्याने खूप काही गोष्टी लवकर आत्मसात करू लागतात. भावना हाताळणे जमू लागते. योगामुळे आपण स्वतःवर प्रेम करू लागतो.

किशोरवयीन मुलांमुलींना सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कार्डिओ, ऐरोबिक आणि नृत्य केले पाहिजे. याच सर्वांबरोबर योगासनंही महत्त्वाची आहेत. नियमित योगासनांमुळे मुले तंदुरुस्त राहतात व त्यांच्यात चांगल्या प्रकारे शारीरिक बदल घडून येतात. याशिवाय चिंता, औदासिन्य आणि असंतुलित मूडपासून दूर राहण्यास मदत होते. तुम्ही स्वतः किशोरवयीन असाल किंवा तुम्ही किशोरवयीन मुलामुलींचे पालक असाल, तर तुम्ही योगासनांचा विचार केला पाहिजे.

योगसाधनेचे विविध फायदे आपण पाहूयात :-

शारीरिक

योगाचा फक्त प्रौढांनाच नाही, तर किशोरवयीन मुलांनाही चांगला फायदा होतो. तो आपल्या प्राचीन संस्कृतीचाच एक भाग आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा संपूर्ण जगभरातील लोकांना एक सारखाच होतो. नियमित योगासनांमुळे आपली ताकद वाढते. शारीरिक लवचिकता निर्माण होते. स्नायूची वाढ होऊन स्नायूंत समन्वय साधला जातो. त्याचप्रमाणे, दिवसभर एकाच जागी बसल्याने शरीर आळशी बनते. लठ्ठपणा वाढतो. शाळेत, क्लासमध्ये बाकावर, घरी टीव्ही, स्मार्टफोन वापरताना तुम्ही बहुतेक वेळ बसून राहिलेले असता. त्यामुळे, योगासनांमुळे शरीराला योग्य आकार येतो. लठ्ठपणाही कमी होतो.

- शरीरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे

शैक्षणिक

किशोरवयीन मुलांमुलींन शाळा, अभ्यास, विविध वर्ग आदींमुळे तणावाचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, विविध कार्यक्रमाला काय घालून गेले पाहिजे, कोणास काय आवडेल, कोणते नाटक, चित्रपट आवडेल आदी अनेक निर्णय घ्यावे लागतात. अगदी अभ्यासक्रमातही इंग्रजी की स्पॅनिश वर्गाची (क्लासची) निवड करावी लागते. याशिवाय त्यांच्या आजूबाजूलाही आवडणाऱ्या गोष्टी घडत असतात. या सर्वांसाठी निर्णयक्षमता आवश्यक असते. आपल्याला एखादा निर्णय घेताना एकाग्रता व शांत मनाची गरज असते, तेव्हा योगशास्त्र खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे किशोरवयीन मुलांची निर्णयक्षमता, एकाग्रताही वाढते व ती चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकतात.

- Nobel Prize 2019 : भारतीय वंशाच्या अर्थतज्ज्ञाला अर्थशास्त्राचे 'नोबेल' जाहीर!

Image may contain: 1 person, sitting, child and table

भावनिक

माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांमुलींना त्यांच्या वर्तमानकालीन जीवनातील कोणत्याही परिस्थितीत योग्य प्रकारे अभ्यास व निर्णय घेण्याचे धाडस योगासनांमुळे येते. शिवाय योगामुळे त्यांचा आत्मविश्वा स वाढतो. भीती नष्ट होते, समजूतदारपणा येतो. मन आनंदी व प्रसन्न राहिल्याने त्यांचा चांगल्याप्रकारे बौद्धिक व शारीरिक विकास घडतो. त्याचप्रमाणे भावनिक क्षमता चांगल्या प्रकारे वाढल्याने खूप काही गोष्टी लवकर आत्मसात करू लागतात. भावना हाताळणे जमू लागते. योगामुळे आपण स्वतःवर प्रेम करू लागतो. प्रत्येक घटनांचा स्वीकार सहजतेने करण्याची क्षमता मुलांच्यात येते.

Image may contain: one or more people and people sitting

सामाजिक

योगाचा अर्थ मीलन असा होतो. शरीर व मनाचे मीलन. म्हणूनच तर योगसाधनेमुळे मन शांत राहण्यास मदत होते, तर शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यास मदत होते आणि आपल्यालाच आपली नव्याने ओळख होते. योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. तुम्ही याच वयात हे सुरू केल्यास त्याचा आयुष्यभर फायदा होईल.

- ज्या नियमाने इंग्लंड झाले विश्वविजेते तोच नियम आयसीसीकडून रद्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishakha Gaikwad writes about Yoga and its importants for teenagers