विमानाने प्रवास करायचाय? फक्त 995 रुपयांत होणार शक्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

25 जानेवारीपासून करता येणार विमानप्रवास

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असेल. मात्र, विमान प्रवासाच्या वाढत्या तिकीट दरामुळे विमानात बसण्याची इच्छा पूर्ण झाली नसेल. पण विमानातून प्रवास करण्याची इच्छा आता विस्तारा विमान कंपनी पूर्ण करणार आहे. या कंपनीच्या विमान तिकिटासाठी फक्त 995 रुपये मोजावे लागणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विस्तारा कंपनीने खास आपल्या प्रवाशांसाठी ही बंपर ऑफर आणली आहे. 'टाटा सन्स' आणि 'सिंगापूर एअरलाईन्स'च्या माध्यमातून स्वस्तातील विमान प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवाशाला 995 रुपयांपासून विमान तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेली ही ऑफर 10 जानेवारी (शुक्रवार) मध्यरात्रीपर्यंतच असणार आहे. ही ऑफर तीन श्रेणीमध्ये उपलब्ध असणार आहे. इकोनॉमी, प्रीमिअम आणि बिजनेस या तिकिटांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ'

Image result for Vistara Airlines Offers Cheap Tickets On

या ऑफरनुसार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी तिकीट स्वस्तामध्ये मिळणार आहे. प्रीमिअम क्लासचे तिकीट 1995 रुपये आणि बिजनेस क्लास विमान तिकीट 5555 रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Image result for Vistara Airlines Offers

तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इकॉनॉमी क्लास तिकीट 14,555 रुपये, प्रीमियम क्लास तिकीट 19,995 रुपये तर बिजनेस क्लास तिकीट 35,555 रुपये असणार आहे. यामध्ये टॅक्सचाही समावेश आहे.

मोदींनी आसाम दौरा रद्द केला कारण...

25 जानेवारीपासून करता येणार विमानप्रवास

10 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत विमान प्रवासाच्या तिकीटाचे बुकिंग करता येणार आहे. या बुकिंगनुसार 25 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंतच विमान प्रवास करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vistara new offer Flight tickets from Rupees 995