विशाखापट्टणममुळं भोपाळच्या आठवणी झाल्या जाग्या; अशीच घडली होती भोपाळ वायू दुर्घटना

Gas-Leakage
Gas-Leakage

विशाखापट्टण - विशाखापट्टणमध्ये गुरुवारी पहाट उजाडली तीच विषारी वायूच्या धुक्यात. पहाटे तीन वाजता एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायूची गळती झाली आणि नागरिकांचा श्‍‍वास कोंडला. दहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जण बेशुद्ध झाले. वायू गळती झाल्याचे समजल्यावर एकच पळापळ झाली. अनेक जण रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. शुद्ध हरपलेल्या लहानग्यांना त्यांचे पालक कडेवर घेऊन जात होते. विषारी वायूने बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पळापळ सुरु होती. हे हृदयद्रावक चित्र पाहताना आठवण झाली ती १९८४मध्ये झालेल्या भोपाळ वायू गळतीच्या दुर्घटनेची. 

35 वर्षांपूर्वी भोपाळ वायू दुर्घटनेबाबतही काहीसा असाच प्रकार घडला होता. 3 डिसेंबर 1984 च्या रात्री घडलेल्या त्या दुर्घटनेच्या आठवणी आणि जखमा विशाखापट्टणम येथील घटनेने पुन्हा ताज्या केल्या. जगातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून आजही मध्य प्रदेशमधील भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यात घडलेल्या घटनेकडे पाहिले जाते. 

सरकारी आकडेवारीनुसार, भोपाळ येथील गॅस वायू गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत  15,000 लोकांनी आपला जीव गमावला होता. लाखो लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचा आणि व्याधींचा सामना करावा लागला. या घटनेतील पीडितांना कंपनीकडून नुकसान भरपाईच्या रुपातील रक्कम मिळवण्यासाठी जवळपास सात-आठ वर्ष ताठकळत बसावे लागले होते.   

श्‍वास घेण्यासाठी तडफड 
कंपनीतून स्टेरेन या विषारी वायूची गळती झाली अन् गोपाळपटणमधील नागरिक साखर झोपेत असतानाच त्यांना श्‍वास घेणे कठीण होऊ लागले. रस्त्यावर पडलेल्या महिला व मुलांची श्‍वास घेण्यासाठी तडफड सुरु होती. अनेक जण मदतीसाठी याचना करीत होते. काही जण तर झोपेत असतानाच बेशुद्ध पडले, असे ग्रामस्थांनी सांगितले. वायू गळतीने जीव कंठाशी आलेले नागरिक रिक्षा, दुचाकी असे मिळेल ते वाहन घेऊन रुग्णालयाकडे धाव घेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com