शरणागतीपूर्वी शशिकलांनी घेतले जयललिता स्मारकाचे दर्शन

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शशिकला यांना अधिक वेळ देण्यास नकार दिला. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्या व्ही.के. शशिकला यांनी शरण जाण्यापूर्वी प्रथम पक्षाच्या दिवंगत सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या स्मारकापाशी थांबून दर्शन घेतले. 

तसेच, शशिकला यांनी पक्षाचे संस्थापक नेते एमजीआर यांच्या स्मारकाचेही दर्शन घेतले. 
त्यांना शरणागतीसाठी वेळ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या चेन्नईकडून बंगळूरकडे निघाल्या. योग्य त्या अधिकाऱ्यांसमोर त्वरीत हजर राहावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शशिकला यांना अधिक वेळ देण्यास नकार दिला. 
शशिकला यांच्या वतीने प्रसिद्ध वकील के.टी.एस. तुलसी यांनी युक्तिवाद केला. विभागीय खंडपीठासमोर त्यांनी शशिकला यांची बाजू मांडली. या खंडपीठाने त्यांना अधिक वेळ देण्यास नकार देत शरणागती पत्करण्यास सांगितले. 
 

Web Title: VK Sasikala, On Way To Jail, Takes Vow At Jayalalithaa Shrine