...तर शशिकला करणार आमरण उपोषण!

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

चेन्नई - तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जर राज्यपालांनी शशिकला यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले नाही, तर त्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मृतिस्थळी आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी राजीनामा दिला आहे. शशिकला या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणी शशिकला यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतरच त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा विचार आहे. शशिकला यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणाचा पुढील आठवड्यात निकाल लागण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच शशिकला यांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, जर राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले नाही, तर आपण आजपासून जयललिता यांच्या स्मृतिस्थळी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा शशिकला यांनी दिला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Web Title: VK Sasikala's Next Move Could Be A Hunger Strike, Say Sources