पंतप्रधान मोदींचा वाढदिवस; पुतीन, केपी ओली यांच्यासह राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 17 September 2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. देशभरासह जागतिक स्तरांवरून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा येत आहेत. यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवून अभिनंदन केलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. देशभरासह जागतिक स्तरांवरून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा येत आहेत. यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवून अभिनंदन केलं आहे.

' रशिया- भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात मोदींचं वैयक्तिक योगदान मोठं आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे, असं रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. भारत-चीन सीमावाद उफाळत असताना पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना या शब्दांत वैयक्तिकरीत्या शुभेच्छा देल्यानं विशेष मानलं जात आहे.

राजनाथसिंह भारत-चीन मुद्द्यावर काय म्हणाले ते वाचा...

 

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पाठवलेल्या संदेशात नेमकं काय म्हटलंय हे त्यांच्या शब्दांत (अनुवादित)-

माननीय पंतप्रधान,

तुम्हाला 70 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या या हार्दिक शुभेच्छांचा स्वीकार करा.
भारत सरकारचे नेतृत्व म्हणून तुम्ही केलेल्या कामामुळे आपल्याबद्दलचा भारतीय जनतेतील आदर वाढला आहे. तसेच तुमच्या उत्तम कामांमुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुमची प्रतिष्ठा वाढली आहे.
आपल्या नेतृत्वाखाली भारत सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे.
भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यानचे सामरिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्यासाठी आपलं वैयक्तिक योगदान खूप मोठं आहे.
दोन्ही देशात निर्माण झालेलं मैत्रीपूर्ण, सौहार्द नातं खूप मौल्यवान आहे. आपल्यासोबत द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संवाद असाच सुरू राहील. तुमच्याबरोबर भविष्यात असंच उत्तम काम करता येईल अशी मी अपेक्षा करतो.
आपल्याला उत्तम आरोग्य, आनंद आणि यश मिळत राहो यासाठी खूप शुभेच्छाआदरपूर्वक

आपला,

व्ही. पुतिन

अध्यक्ष, द रशियन फेडरेशन

 रशियासोबत भारताची मैत्री ही जुनी आणि घट्ट आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून रशियाबरोबर भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी भारताची अमेरिकेशी जवळीक वाढल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये थोडाफार तणाव आला होता. तरिदेखील भारत रशियामधील मैत्री कायम आहे.

नितिन गडकरींना कोरोनाची बाधा...

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपल्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपणाला हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण नेहमी एकत्रितपणे काम करत राहू. '  

 

कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ' पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ', असं ट्विट करून राहूल गांधींनी शुभेच्छ दिल्या आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vladimir Putin Nepal Prime Minister KP Sharma oli Happy birthday Modi  Rahul Gandhi