'व्होट बँके'साठी सरकारने बाबासाहेबांना 'रामजी' बनवले : मायावती

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

'योगी सरकार फक्त 'व्होट बँके'साठी बाबासाहेबांना 'रामजी' बनवण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे''.

- मायावती, सर्वेसर्वा, बसप

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात 'रामजी' हे त्यांच्या वडिलांचे नाव वापरण्याबाबतचा आदेश काढला. या आदेशानंतर राजकीय स्तरावर एकच चर्चा आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले. ''योगी सरकार फक्त 'व्होट बँके'साठी बाबासाहेबांना 'रामजी' बनवण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे'', असा आरोप मायावतींनी केला.

मायावती म्हणाल्या, भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली आहे. त्यासाठी त्यांचा संपूर्ण भर हा नाव बदलण्यावर आहे. योगी सरकार फक्त 'व्होट बँके'साठी बाबासाहेबांना 'रामजी' बनवण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

दरम्यान, 'रामजी' हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते. उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर रामजी हे नावही आता समाविष्ट केले जाणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. 

Web Title: For Vote Bank Yogi Government Added name RAMJI says Mayawati