'ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या ; 17 राजकीय पक्षांची मागणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गेल्या काही महिन्यांपासून ईव्हीएममध्ये बिघाड आणि त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले. या प्रकारांमुळे राजकीय स्तरावर टीकाही केली जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत 'ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन'ऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घ्यायला हवे, अशी मागणी देशातील 17 राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या वापराची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये समाजवादी पक्षासह तृणमूल काँग्रेसचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ईव्हीएममध्ये बिघाड आणि त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले. या प्रकारांमुळे राजकीय स्तरावर टीकाही केली जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 

दरम्यान, समाजवादी पक्षाने यापूर्वी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी अनेकदा केली. तसेच आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. जर असे झाले नाही तर पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समाजवादी पक्षाकडून देण्यात आला.

Web Title: Vote fo EVM instead of ballot Demanding 17 political parties