Voter's Day : मतदार जागृती स्पर्धा; विजेत्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

उद्या २५ जानेवारी रोजी मतदार दिनानिमित्त मतदार जागृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Voters Day
Voters Day

नवी दिल्ली : दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त यंदा निवडणूक आयोगाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगानं उद्या सोशल मीडियावर 'माझं मत माझं भविष्य - एका मताची शक्ती' या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. यामधील विजेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याची माहिती, निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. Voters Day National Award to winner of Voter Awareness Contest says ECI

'माझं मत माझं भविष्य - एका मताची शक्ती' या स्पर्धेत गाणी, घोषवाक्ये, प्रश्नमंजुषा, व्हिडिओ मेकिंग आणि पोस्टर डिझाइन यांसारख्या विविध श्रेणीतील स्पर्धा असतील, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. यावेळी विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसं आणि प्रशंसापत्रं देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सन 2021-22 या वर्षासाठीच्या सर्वोत्कृष्ट निवडणूक व्यवहारांसाठी राष्ट्रीय पुरस्कार राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर सरकारी विभाग, भारतीय निवडणूक आयोग आणि माध्यम संस्थांना देखील मतदारांच्या जागृतीसाठी अमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कारही दिले जाणार आहेत, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

नव मतदारांना ओळखपत्रांचे वाटप

या कार्यक्रमादरम्यान, नव्यानं नावनोंदणी झालेल्या मतदारांचाही सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना मतदार छायाचित्र ओळखपत्राचेही (EPIC) वाटप करण्यात येणार आहे. आयोगानं अलीकडेच नवीन नोंदणी केलेल्या मतदारांना वैयक्तिक पत्र आणि मतदार मार्गदर्शक पुस्तिकेसोबत मतदार ओळखपत्र पोहोचवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

का केला साजरा केला जातो 'राष्ट्रीय मतदार दिवस'?

सन 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त (25 जानेवारी 1950) याचं आयोजनं केलं जातं. देशातील मतदारांसाठी ही दिवस समर्पित असून मतदारांमध्ये जागरुकता तसेच निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com