बेळगाव जिल्ह्यात 2 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

बेळगाव उत्तरला 40 टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिणला 37.24 टक्के मतदान, बेळगाव ग्रामीण भागात 36.3 टक्के मतदान करण्यात आले आहे. खानापूर मतदार संघात 40.16 टक्के मतदान झाले. 

बेळगाव : जिल्ह्यात आज (ता.12) दुपारी 2 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान झाले. चुरशीने मतदान जिल्ह्यात झाले असून, सर्वत्र अनेक ठिकाणी रांग लावून मतदानाचा हक्क बजाविला. दरम्यान, बहुतेक ठिकाणी पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी मतदान केले. 

बेळगाव उत्तरला 40 टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिणला 37.24 टक्के मतदान, बेळगाव ग्रामीण भागात 36.3 टक्के मतदान करण्यात आले आहे. खानापूर मतदार संघात 40.16 टक्के मतदान झाले. 

निपाणीत 48.27 टक्के, चिक्कोडी सदलगा 46.27 टक्के, अथणी 50.69 टक्के, कागवाड 40.2 टक्के, कुडची 27 टक्के, रायबाग 41 टक्के, हुक्केरी 39.11 टक्के, अरभावी 39.11 टक्के, गोकाक 40.77 टक्के, यमकनमर्डी 44.58 टक्के, बैलहोंगल 38.65, कित्तूर 26.33 टक्के, सौदत्ती 41.63 टक्के, रामदूर्ग 32.14 टक्के मतदान झाले आहे. 

मतदान केंद्र अधिकारी शुक्रवारी रात्रीच केंद्रात दाखल झाले. नियोजित वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी सात ते साडे सात वाजता संथ प्रतिसाद मिळाला. पण, त्यानंतर वेग वाढला. रांग लावून मतदान करण्यास सुरु झाले. सकाळी दहानंतर बहुतेक केंद्राच्या गर्दी दिसली. 

Web Title: voting in belgaum

टॅग्स