भाजप उमेदवाराचे गोपूजा करून मतदान

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

भाजपचे बदामी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी मतदानापूर्वी गोपूजा केली. श्रीरामुलू यांनी विधीवत भगवे वस्त्र, हळदीने माखलेल्या गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बदामी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान आज सकाळपासून सुरु असून, भाजपचे बदामी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी मतदानापूर्वी गोपूजा केली. श्रीरामुलू यांनी विधीवत भगवे वस्त्र, हळदीने माखलेल्या गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बळ्ळारी येथील श्रीरामुलू यांनी बदामी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात लढत आहेत. श्रीरामुलू बळ्ळारीजवळील मोलकलमुरु मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. श्रीरामुलू यांनी निवडणुकीपूर्वी गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सगळीकडे एकच चर्चा आहे.  

दरम्यान, श्रीरामुलू आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस येड्डीयुरप्पा हे दोघेही विधिमंडळ सदस्य राहिले आहेत.

Web Title: Before Voting High Profile BJP Candidate Sriramulu Performs Cow Worship