उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेतील पहिला टप्प्यासाठी आज (शनिवार) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली.

उत्तर प्रदेशमधील 15 जिल्ह्यांतील 73 मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज 26,823 मतदान केंद्रातून 839 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांत सेव्ह होणार आहे. आज शामली, अलिगड, मुझफ्फरनगर, मथुरा, बुलंदशहर आणि आग्रा अशा काही संवेदनशील शहरातही मतदान होत आहे. येथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासून मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

गोवर्धन येथील मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी मतदान केले. 'या निवडणुका म्हणजे घराणेशाही नसून या राष्ट्रवादाच्या निवडणूक आहेत', अशा प्रतिक्रिया शर्मा यांनी यावेळी व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशमध्ये 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी आणि 4 आणि 8 मार्च अशा सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 11 मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Web Title: Voting started in UP