तोंडी तलाकवर मतदान दिल्लीत; शरद पवार मुंबईत

टीम ई-सकाळ
मंगळवार, 30 जुलै 2019

तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते.

नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते.

राज्यसभेत तोंडी तलाकच्या विधेयकावर चर्चा झाली. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. त्यानंतर या विधेयकावर मतदान घेण्यात आले. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित असल्याने मतदानावेळी ते उपस्थित नव्हते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील मतदानावेळी हजर नव्हते. 

बसप, टीआरएस गायब

तोंडी तलाक विधेयकावर राज्यसभेत ज्यावेळी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष (बसप) आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) सदस्य उपस्थित नव्हते.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for Triple Talaq in Delhi but Sharad Pawar in Book Publish Ceremony