वृंदावनात होणार जगातील सर्वात उंच मंदिर

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

वृंदावन (उत्तर प्रदेश) - येथे 'चंद्रोदय मंदिर' हे जगातील सर्वात उंच असे कृष्णमंदिर उभारण्यात येणार असुन, त्यांची उंची सुमारे 200 मीटर एवढी असणार आहे. साडेपाच एकरमध्ये बांधण्यात येणाऱ्या या मंदिराला सत्तर मजले असणार आहेत.

इस्कॉन (बंगळूरु) यांच्या कडून या मंदिराच्या बांधणीचा मोठा खर्च उचलण्यात येणार असून, थ्रोनटन टोमासेट्टी ही नामांकीत कंपनी मंदिराचे बांधकाम करणार आहे. साधारण 300 कोटी एवढा खर्च मंदिराच्या बांधकामासाठी येणार आहे. 

काही कृष्णभक्तांनीच या मंदीराचे डिझाईन तयार केले असून, रॉकेट सारखे दिसणारे हे मंदीर भूकंप प्रतिरोधक असणार आहे. याशिवाय मंदिराच्या आवारात ‘कृष्णलीला थीम पार्क’ उभारले जाणार आहे. यात कथा सांगण्यासाठी खास विभाग, संगीतावर आधारित कारंजे, भव्य बगीचे, यमुना नदीत जलविहार, गोशाळा आदींचा समावेश असेल.

व्हिडिओ सौजन्य़ -  Vrindavan Chandrodaya Mandir youtube

Web Title: Vrindavan Chandrodaya mandir all set to be tallest temple in the world

व्हिडीओ गॅलरी