राहुल यांच्या 'भूकंपा'ची आम्हाला प्रतिक्षा: भाजप

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, "राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्‍त्यांनी बेळगावमध्ये राहुल भूकंप घडवतील, असा दावा केला होता. मात्र तसे काही झालेले मला दिसले नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीने पंतप्रधानांविरुद्ध बोलताना प्रत्येक शब्द जपून वापरायला हवा. मात्र आज त्यांची (राहुल) प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळेच स्वत:साठीच निर्माण केलेल्या संकटामुळे ते त्रस्त झाले आहेत.'

शनिवारी बेळगाव येथील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीचे संकट हे मोदीनिर्मित संकट असल्याची टीका केली होती. 'मोदी यांना निवडणूक प्रचाराच्या वेळी ज्यांनी मदत केली अशा 50 श्रीमंत कुटुंबांनी नोटाबंदीनंतर आठ लाख कोटी रुपये बॅंकेत जमा केले आहेत', असा आरोप गांधी यांनी यावेळी बोलताना केला.

Web Title: waiting for Rahul's earthquake