वणीच्या पित्यास राज्य सरकारची मदत

पीटीआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

श्रीनगर : कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वणीचा भाऊ खालीद वणी याच्या मृत्यूप्रकरणी मेहबूबा मुफ्ती सरकारने वणीच्या पित्यास आर्थिक मदत देऊ केली आहे. सर्वसामान्य प्रकरणांप्रमाणेच हीदेखील एक घटना असून, प्राथमिक अहवालाचा आधार घेत आम्ही ही मदत करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतच्या सर्व आक्षेपांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार सुहेल बुखारी यांनी नमूद केले. दरम्यान, भाजपने मात्र या मदतीस आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसने मात्र याच मुद्यावरून भाजपला धारेवर धरले आहे.

Web Title: Wani father to help the state government