मोदी आणि शहांना अटक करायचे होते : माजी पोलिस अधिकारी

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

इशरत जहाँ चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायचे होते.

-  डी. जी. वंजारा, माजी पोलिस महानिरीक्षक, गुजरात

नवी दिल्ली : इशरत जहाँ चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायचे होते, अशी माहिती गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी एका विशेष न्यायालयात दिली. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीबीआयला अटक करायची होती. मात्र, त्यांना ही अटक करता आली नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी तपास अधिकारी होतो. मोदी गोपनीयरित्या याप्रकरणाची चौकशी आपल्याकडे करत होते, अशी माहिती वंजारा यांनी यापूर्वी दिली होती. दरम्यान, सीबीआयने अमित शहा यांना 2014 मध्ये पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. जून 2004 मध्ये मुंबईतील इशरत जहाँ आणि तिचा मित्र जावेद उर्फ प्राणेश आणि मूळ पाकिस्तानी असलेल्या जिशान जौहर आणि अमजद अली राणा यांना तत्कालीन पोलिस महानिरीक्षक वंजारांच्या पथकाने अहमदाबादजवळ केलेल्या चकमकीत ठार करण्यात आले होते. 

Web Title: want to arrest narendra modi and Amit shah says police officers D G vanjara