भोपाळ चकमकीवरून वाक्‌युद्ध

पीटीआय
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप
भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे.

त्याचवेळी भाजपने कॉंग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप
भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे.

त्याचवेळी भाजपने कॉंग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

आठही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलाने सोमवारी झालेल्या पोलिस चकमकीत सर्व गोळ्या कमरेच्यावर डोक्‍यात आणि छातीत लागल्याचा दावा केला आहे. हे दहशतवादी भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळून जात असताना ही चकमक झाली होती.

या सर्वांना पुढील बाजूने गोळ्या झाडण्यात आल्याचे आणि त्यांच्या डोक्‍यावर आणि छातीवर संशयास्पद जखमा असल्याचे आढळून आल्याचा दावा वकील परवेझ अलम यांनी शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमचा पक्ष तथाकथित चकमकीच्या सिद्धांताशी सहमत नसल्याचे तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. लोकांच्या डोक्‍यात अनेक अनुत्तरित प्रश्‍न उपस्थित होत आहेत. राजकीय सूडाच्या नावाखाली हे सर्व घडत आहे. अशा प्रकारच्या मुद्यांमुळे राष्ट्रीय अखंडता आणि ऐक्‍याविषयी मला खूप चिंता वाटत आहे, असेही त्या म्हणाल्या.

हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंह यांनी कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. दिग्विजयसिंह यांनी चकमकीविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते. सिद्धार्थ नाथ म्हणाले, की "सिमी'च्या दहशतवाद्यांना तुरुंगापेक्षा कॉंग्रेस अधिक सुरक्षित असल्याचे वाटल्यामुळे ते पळून जात होते. दहशतवाद्यांच्या बाजूने बोलताना कॉंग्रेस नेते त्यांच्या बचावाचा प्रयत्न करत आहेत.

'माझा मुलगा दहशतवादी नव्हता'
चकमकीत ठार झालेल्या मुजीब शेख याची आई मुमताज शेख यांनी, माझ्या मुलाला कट करून ठार मारण्यात आल्याचा आरोप केला आहे. माझा मुलगा दहशतवादी नव्हता. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला नव्हता. न्यायासाठी आता मी लढा देणार आहे, असे मुमताज यांनी सांगितले.

Web Title: war of word on bhopal encounter