Mon, Sept 25, 2023

Amritpal Singh: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग पंजाब पोलिसांच्या ताब्यात
Published on : 23 April 2023, 2:20 am
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. अमृतपाल सिंग याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त समोर आले आहे. 'वारिस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल शनिवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण आला. अमृतपाल सिंगचा साथीदार पापलप्रीत सिंग याला आधीच अटक करण्यात आली होती, तेव्हापासून अमृतपालला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. अमृतपाल सिंगवर शांतता भंग करणे, हिंसाचार करणे असे अनेक आरोप आहेत. सध्या आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला ताब्यात घेतले आहे.
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग 36 दिवसांनंतर पंजाब पोलिसांच्या ताब्यात आला आहे. 18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारीस पंजाब दे' या संस्थेवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तो फरार होता.