फुटीरतावाद्यांशी चर्चा करणारे वाजपेयी, अडवाणी देशद्रोही आहेत का? - यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

"राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे अत्यावश्‍यक आहे. अलिकडच्या काळात फुटीरतावाद्यांशी चर्चा करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यात येते. मग तसे म्हटले तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी देशद्रोही ठरतात का? तशाच प्रकारे मग लालकृष्ण अडवाणीही देशद्रोही ठरतात का?' असे प्रश्‍न सिन्हा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी करण्यासाठी फुटीरतावाद्यांशी नेत्यांशी चर्चा करण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

"राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे अत्यावश्‍यक आहे. अलिकडच्या काळात फुटीरतावाद्यांशी चर्चा करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यात येते. मग तसे म्हटले तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी देशद्रोही ठरतात का? तशाच प्रकारे मग लालकृष्ण अडवाणीही देशद्रोही ठरतात का?' असे प्रश्‍न सिन्हा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केले आहेत.

"चर्चेअंती राज्यात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे काश्‍मीरमधील सर्व लाभधारकांनी या चर्चेत सहभाग घ्यायला हवा', असेही सिन्हा पुढे म्हणाले. काश्‍मीरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याबाबत बोलताना ते म्हणाले, मतदान करण्यासाठी कोणीही आपला जीव धोक्‍यात घालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्रीनगरमधील लोकसभेच्या एका जागेसाठी रविवारी पोटनिवडणुका झाल्या. यावेळी केवळ सात टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानादरम्यान सुरक्षा पथकासोबत झालेल्या चकमकीत आठ जण ठार झाले. याविरुद्ध राज्यातील फुटीरतावावाद्यांनी तीन दिवसांचा नेत्यांनी बंद पाळला होता. मतदानापासून दूर राहिल्याबद्दल फुटीतरवावाद्यांनी नागरिकांचे आभार मानत सामान्य जीवन सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Was Atal Bihari Vajpayee anti-national because he talked to separatists, asks Yashwant Sinha