Video : आधी शेतकरी, आता झाडूवाली; हेमामालिनींचा नवा स्टंट

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज संसदेबाहेर झाडूने स्वच्छता केली. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 

नवी दिल्ली : भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज संसदेबाहेर झाडूने स्वच्छता केली. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 

यापूर्वी त्यांनी अशी स्टंटबाजी केली आहे. याचवर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शेतकऱ्यासह शेतात काम केले होते. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी बरीच टीका केली होती. ''जेव्हा मी उत्तर प्रदेशातील गावांच्या दौऱ्यावर होते तेव्हा रस्त्यावरुन जाताना सोनेरी रंगाची भाताची पेंड दिसली आणि न राहावून मी त्याच्या कापणीसाठी उतरले,'' असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

 

संसेदेबाहेर झाडू मारताना त्यांनी काहीच नीट उमगले नाही. एकीकडे अनुराग ठाकूर सराईतपणे झाडून घेत असताना हेमा मालिनी मात्र, पूर्ण गोंधळल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch Hema Malini take part in Swachh Bharat Abhiyan in Parliament premises