जेव्हा पंतप्रधान सांडलेली कॉफी स्वच्छ करतात

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

अ‍ॅमस्टरडॅम - आपल्याकडच्या व्हिआयपी कल्चरमध्ये अशा घटना दुर्मिळच. परंतु, नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुट यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. झाले असे की, पंतप्रधान रुट यांच्या हातून कॉफी सांडली. त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याकडून त्यांनी स्वत: 'क्लिनिंग मॉप' हातात घेतला आणि त्यांनतर त्यांनी फरशीवर सांडलेली कॉफी स्वच्छ केली. 

पंतप्रधानांना असे करताना पाहून सगळेच अवाक झाले. सर्व स्वच्छता कर्मचारी तेथे जमा झाले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवत पतंप्रधांनाच्या या कृतीचे कौतुक केले. थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. 

या छोट्याश्या घटनेमुळे मार्क रुट यांनी आपणही सर्वसामान्यांपैकीच एक आहोत याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले.

Web Title: Watch Viral Video of Dutch PM Mopping Coffee He Spilled in Parliament