चंद्रामुळेच पृथ्वीवर पाणी

चंद्रामुळेच पृथ्वीवर पाणी

पुणे ः मंगळ, बुध, गुरू एवढेच काय, सध्या तरी माहीत असलेल्या ब्रम्हाडातील कोणत्याच ग्रहावर पाणी आढळत नाही, तर मग पृथ्वीवर कसे? असा प्रश्‍न आपल्या सर्वांना पडला असेल. यावर अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांमध्ये वादविवाद चालू आहे. यावर नुकताच एक सिद्धांत जर्मनीतील शास्त्रज्ञांनी मांडला. त्यानुसार 4.4 अब्ज वर्षांपूर्वी जेंव्हा प्राचीन पृथ्वीला "थीया' नावाचा लघुग्रह येऊन धडकला तेंव्हा त्याने पाण्याचे वरदान पृथ्वीला दिले. म्हणजेच पाणी हे दुसऱ्या ग्रहाची देण आहे!

"नेचर ऍस्ट्रॉनॉमी'या आंतरराष्ट्रीय शोधपत्रीकेत मे 2019 मध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. ( ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा ) जर्मनीतील मॅंचेस्टर येथील संशोधकांनी हा शोध निबंध प्रसिद्ध केला आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञ पृथ्वीला धडकणारा "थीया' हा लघुग्रह आपल्याच सुर्यमालेतून आल्याचे म्हणत होते. पण, हा लघुग्रह दुसऱ्या सुर्यमालेतून आला असून त्यानेच प्राचीन पृथ्वीला धडकताना पाण्याचे दान दिले, असा दावा संशोधकांनी केला आहे. पृथ्वीवर आढळणारा "मोलीब्देनम' हा धातू बाहेरच्या जगातून आला असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचाच शोध घेताना काही तथ्य समोर आली आहे. 

पृथ्वी निर्मितीच्या वेळेस आपल्या सुर्यमालेत शुष्क (कोरडे) खनिजे आढळत होती. ओले किंवा थोड्याफार प्रमाणात द्रव स्वरूपात असलेले खनिजे ही बाह्य जगताची देणं आहे. म्हणजेच द्रव स्वरूपात आढळणारी मूलद्रव्ये "थीया' लघु ग्रहातून आली. त्यांनीच कार्बन असलेली मूलद्रव्ये पृथ्वीवर आणली. त्यातूनच पृथ्वीवर पाणी आणि इतर सेंद्रिय मूलद्रव्ये निर्माण झाली. पदार्थाची चौथी अवस्था जिला प्लाझ्मा म्हणून ओळखले जाते तिचा अभ्यास केल्यावर यातील गुपिते समोर आली. खर म्हणजे "मोलिब्देनम' या मुलद्रव्याने शुष्क आणि द्रव मुलद्रव्यांचे वर्गीकरण करण्यास शास्त्रज्ञांना मदत झाली आहे. याच्याच अध्ययनातून पृथ्वीवर आढळणारे पाणी आणि यदा कदाचित आपणही लघु ग्रह असलेल्या "थीया'ची देण असावी. 

मॅंचेस्टर येथील संशोधकांच्या मते "आपण प्रथमच चंद्राच्या निर्मीती आणि पृथ्वीवरील पाणी यांचे संबंध जोडले आहेत. सोप्यात सांगायचे म्हणजे चंद्र नसता तर पृथ्वीवर जीवनच नसते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा कललेला अक्ष स्थिर आहे. त्याचाच फायदा जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी झाला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com