आलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्यूसेक्स विसर्ग

water release of 5 lakhs 30 thousand cusecs from Almatti dam
water release of 5 lakhs 30 thousand cusecs from Almatti dam

बेळगाव : आलमट्टी जलाशयातून 5 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आठपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. आलमट्टी येथील पाटबंधारे विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

पण आलमट्टी जलाशयातील इनफ्लो मात्र जास्त आहे. शनिवारी सकाळी जलाशयात 5 लाख 70 हजार क्यूसेक्स इनफ्लो आहे. आलमट्टी जलाशयातील पाण्याच्या फुगवट्यामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केला आहे. तर कर्नाटकातील पूरस्थितीला महाराष्ट्र जबाबदार असल्याचा आरोप कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आलमट्टी जलाशय चर्चेत आले आहे.

जलाशयाची कमाल उंची 519.60 मीटर आहे. सध्या जलाशयात 517.30 मीटरपर्यंत पाणीसाठा आहे. जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. 10 ऑगस्ट रोजी जलाशयात 88.758 टीएमसी पाणीसाठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com