आर्थिक आणीबाणीमुळे अर्थसंकल्प निरर्थक : प. बंगालचे अर्थमंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोलकाता (प. बंगाल) : अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू असताना पश्‍चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा हे बैठकीतून बाहेर पडले असून देशातील आर्थिक आणीबाणीमुळे यंदाचा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोलकाता (प. बंगाल) : अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू असताना पश्‍चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा हे बैठकीतून बाहेर पडले असून देशातील आर्थिक आणीबाणीमुळे यंदाचा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्रा म्हणाले, "अर्थसंकल्पपूर्व बैठकीत माझे सादरीकरण झाल्यानंतर मी बाहेर पडलो, हे मी अतिशय जड अंत:करणाने सांगत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याबाबत मी यापूर्वीही मी सांगितले आहे. ही आर्थिक आणीबाणी असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरणार आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचा बहुतेक भाग अर्थसंकल्पापूर्वीच जाहीर करून टाकल्याने यंदाचा अर्थसंकल्प तुलनेने निरर्थक आहे. गुजरातमध्ये हिऱ्यावर काम करणारे पश्‍चिम बंगालमधील कामगार रोजगार नसल्याने परतले आहेत. महाराष्ट्रातील 24 लाख यंत्रमाग उद्योगांपैकी 12 लाख उद्योग बंद पडले आहेत आणि तेथील कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत.' एका संशोधनाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, गेल्या 50 दिवसांत व्यवहार करण्यासाठी (पैशांची देवाणघेवाण) 1.26 लाख कोटी रुपये खर्च झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.

Web Title: WB FM walks out of pre-budget meet, terms it meaningless